| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे न्हावा- शेवा पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरल्याने पोलिसांना कार्यालयीन कामकाज सोडून कार्यालयातून पाणी बाहेर काढण्याचे काम करावे लागले. उरण शहरात जोरदार पाऊस झाल्याने उरण न्यायालय, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय ठिकाणच्या मोकळ्या जागांत तलावसदूष परिस्थिती निर्माण असून वेश्वी, भेंडखळ, म्हातवली गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने रहिवाशांची एकच तारांबळ उडाली आहे.
या पावसामुळे जेएनपीए बंदर परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या न्हावा- शेवा पोलीस ठाण्याला पाण्याने वेढला आणि सतत कोसळलेल्या पावसामुळे साचलेले पाणी चक्क पोलीस ठाण्याच्या इमारतीत शिरले. यामुळे पोलीस ठाण्याला ही तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. ठाण्याच्या इमारतीत अचानक पाण्याचा लोंढाच आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
न्हावा- शेवा पोलीस ठाण्यात शिरले पाणी
