नेरळ-दहिवली पुलावरून पाणी

50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक पुलांवरून पाणी गेल्याने बुधवारी सकाळपासूनच सुमारे 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला. अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नेरळमधील साकाव वाहून गेला तसेच शेतीचे बांध फुटून शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. दहिवली पुलावरून दरवर्षी पाणी जाऊन वाहतूक बंद करण्यात येत आहे. पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत असताना अद्याप पुलाचे काम होत नसल्याने दरवर्षी नागरीकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

नेरळ-कळंब राज्यमार्ग प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, उल्हासनगर बदलापूर अशा अनेक ठिकाणी जाणार्या कामगारांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच कर्जत कल्याण मार्गावरील नेरळ सब रजिस्टर ऑफिसच्या मागे असलेला साकावदेखील पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील देखील नागरिकांची गैरसोय झाली आहे.
बदलापूर-अंबरनाथदरम्यान रेल्वे रूळावर पाणी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूनदेखील एक ते दोन तास ठप्प झाली होती. कर्जत-कल्याण कडे वाहून बंद करण्यात आली होत. एकूणचा या पावसाने अनेक अडचणी वाढल्या असून, अनेकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले.

Exit mobile version