| रोहा | प्रतिनिधी |
रोहा अष्टमी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनी व यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मंगळवारी (दि.19 ) रोहा अष्टमी शहारातील एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी केले आहे.
डोलवहाल पाणीपुरवठा योजनेंतर्गत रोहा अष्टमी शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. ही योजना 1995 साली तत्कालीन आ. सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आली होती. 30 वर्षांपासून या योजनेवर देखभाल दुरुस्तीच्या नावाने करोडो रुपये खर्च करण्यात आले आहे. ही योजना जुनी असल्यामुळे नगरपालिकेकडून वारंवार देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या शट डाऊनच्या दरम्यान सर्व दुरुस्तीचे कामे पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रशासन अपार मेहनत घेते. याच धरतीवर रोह्यात मंगळवारी (दि. 19) संपूर्ण रोहा अष्टमी भागातील पाणीपुरवठा बंद असणार, अशी माहिती मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी दिली.






