हेटवणेचा पाणीपुरवठा ‘या’ कालावधीत बंद

| उरण। वार्ताहर ।

हेटवणे जलवाहिनीवरील गावांतील पाणी पुरवठा 05 जानेवारी ते 06 जानेवारी या कालावधीत बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणी पुरवठा शुक्रवार 05 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपासून ते शनिवार 06 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

Exit mobile version