हेटवणे जल वाहिनीवरील गावांचा पाणी पुरवठा बंद

। पनवेल । वार्ताहर ।
सिडकोचा हेटवणे धरणावरील विमोचक, मुख्य जलवाहिनी आणि जिते जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी हेटवणे धरणामधून तसेच जलशुध्दीकरण केंद्र येथून होणार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सिडकोच्या द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा व जे.एन.पी.टी. पोर्ट विभागांतील तसेच हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांचा पाणी पुरवठा शुक्रवार, 3 जून रोजी संध्याकाळी 7.00 वाजेपासून ते शनिवार, 4 जून रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच रविवार, 5 जून रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, तरी या कालावधीत उपरोक्त परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून पाण्याचा जपून वापर करावा आणि सिडकोस सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहेत.

Exit mobile version