| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषद क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे. शहरातील काही भागात पाण्याचे कारंजे उडत असून पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच, गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. उरण नगरपरिषद क्षेत्रात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढली आहे; परंतु, पाण्याचे स्रोत कमी आहेत. रानसई धरण आणि पुनाडे धरण हे दोन प्रमुख पाण्याचे स्रोत आहेत. परंतु, त्यांची क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व पाण्याची बचत करण्यासाठी उरण नगरपरिषदेने कडक व धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







