राज्यात प्रत्येक गावामध्ये पाणी देणारच

पाणीपुरवठा मंत्री गुलाब राव पाटील यांचे प्रतिपादन
माणगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जलजीवन मिशन देशामध्ये राज्यसरकारने 50 % आणि केंद्रसरकारचे 50 % आणि 10% लोकवर्गणी याच्याकरिता महाराष्ट्रामध्ये जवळपास 47 हजार गाव आहेत त्याच्यापैकी 27 हजार गावांमध्ये गावामध्ये पाणी देणं हा आमचा उद्देश असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
माणगाव तालुक्यातील मांगरूळ येथील नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी 28 ऑक्टोबर संपन्न झाला.त्यानंतर लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील सभागृहात महाड, माणगाव,पोलादपूर विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत पाण्याबाबत अधिकारी वर्गाला विशेष अशा सूचना ग्रामविकास स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या. या बैठकीला आमदार भरत गोगावले, विनोद घोसाळकर,सीईओ किरण पाटील,राजिप सदस्या अमृता हरवंडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे सुजित शिंदे, गजानन अधिकारी,लोणेरे सरपंच रवींद्र टेंबे, उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर,तहसीलदार प्रियांका आयरे,नायब तहसीलदार बी.वाय .भाबड,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी,कर्मचारी,विविध तालुक्यांतून सभापती आदी उपस्थित होते.


जिथं जिथं पाण्याची अत्यावश्यक गरज आहे त्या त्या ठिकाणी डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावामध्ये पाणी मिळालं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. कोणतेही जात,धर्म ,पक्ष न पाहता सर्वांना काम करावे.
गुलाबराव पाटील,मंत्री

Exit mobile version