ताम्हिणी घाटातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावपासून जवळच असलेल्या माणगाव- पुणे रस्त्यावरील निसर्गरम्य अशा ताम्हिणी घाटातील फेसाळ धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असून सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी या धबधब्यांवर पर्यटकांची विशेष अशी गर्दी दिसते. या धबधब्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेताना दिसतात.

कोंडेथर गावच्या हद्दीत ताम्हिणी घाटात हे फेसाळ धबधबे आहेत. याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणातून पर्यटक या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात. विशेषकरून सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी या धबधब्यांवर पर्यटक आवर्जून येत असतात. हा सर्व ताम्हिणी घाटाचा परिसर नयनरम्य असा असून याठिकाणी विशेष थंडावा जाणून पावसाळ्यात डोंगरमाथ्यावर धुके दिसत असतात. या निसर्गरम्य परिसर व धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी गर्दी असते. येथे आल्यावर पर्यटक फोटो घेण्याबरोबरच सेल्फी काढत आपला आनंद द्विगुणित करीत असतात.

Exit mobile version