एनडीआरएफ, एसडीआरएफला जे जमले नाही ते आम्ही केले

। माणगाव । प्रतिनिधी ।
रेस्क्यू ऑपरेशन करून ठाणे येथे परतताना माणगाव येथे प्रसार माध्यमांजवळ बोलताना टीमचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष नामदेव कदम यांनी सांगितले कि, आमची 16 सदस्यीय टीम ही दरडग्रस्त तळीये गावांत सर्वात प्रथम घटना घडली. त्याचदिवशी 22 जुलै रोजी दाखल झाली. तेथे गेल्यावर घटनास्थळाची पाहणी करून रात्री आम्ही मुक्कामाला माणगाव हॉटेल आनंद भुवन येथे आलो.

नंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत आम्ही आमचे रेस्क्यू ऑपरेशन सलग चार दिवस सुरु ठेवले. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या टीमला जे जमले नाही ते आम्ही करून घटनास्थळी कमरेच्या वर चिखलातून मार्गक्रमण काढीत 15 मृतदेह बाहेर काढले. यावेळी आमच्या पथकातील तीन ते चार जवानांना मातीत दडून राहिलेले पत्रे, काचा, खिळे लागून त्यांना जखमा झाल्या. त्याही परिस्थितीत आमचे जवान आपले कार्य बजावत होते.अशाच प्रकारे आम्ही गेल्यावर्षी 24 ऑगस्टला महाड येथे झालेल्या तारिक गार्डन या पाच मजली इमारतीच्या दुर्घटनेत रेस्क्यू ऑपरेशन करून तेथील मृतदेह बाहेर काढले. शिवाय एका पाच वर्षीय बालकाला तसेच 65 वर्षीय वृद्ध महिलेला सहीसलामत बाहेर काढले.

Exit mobile version