मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कोणत्या पक्षाचे नाही

आमदारांचा आक्रमक पवित्रा; आंदोलक ताब्यात

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं उपोषणं होत आहेत. अशातच मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. आज तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांनी आंदोलन केले. या आमदारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी हे आमदार आक्रमक झाले. मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र हा अतिशय संवेदनशील परिसर आहे तसेच जवळ वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आमदरांना ताब्यात घेतले यावेळी या आमदारांनी घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.

आमदार आझाद मैदानातील पोलीस चौकीत
आमदारांनी मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं. तसंच राज्यपालांची देखील भेट घेतली होती. मंत्रालयात आंदोलन करत असताना या आमदारांना ताब्यात घेण्यात आलं. या आंदोलन करणाऱ्या आमदारांना आझाद मैदानातील पोलीस चौकीत आणण्यात आलं आहे. मराठा आरक्षणांसोबत मुस्लिम, धनगरांना आरक्षण हवं, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.
Exit mobile version