आम्ही दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणत नाही

आ. भरत गोगावलेंचा विरोधकांना टोला

| माणगाव | वार्ताहर |

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युतीचे सरकार कार्यरत आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांची भूमिपुजने व उद्घाटने आम्ही नारळ फोडून करीत नाही. आम्ही कधी ही दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणत नाही, असे प्रतिपादन शिसवेना पक्ष प्रतोद आ. भरत गोगावले यांनी (दि.10) मार्च खरवली येथे पार पडलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी केले.

खरवली ते सुरव/निजामपूर ते खरवली रस्ता तयार करणे (10 लाख), खरवली ते सूरव/तळे रस्ता ग्रा. मा. 24 तयार करणे (20 लाख), सुरव/तळे हरिजनवाडी वस्ती रस्ता तयार करणे (10 लाख) या कामांचे उद्घाटन व खरवली ते आदिवासीवाडी रस्ता तयार करणे (10 लाख), राजिवली हरिजनवाडी रस्ता तयार करणे (10 लाख), बोरघर खरवली हरिजन मार्ग रस्ता तयार करणे (10 लाख), चेरवली स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे, बखरवली वरचीआळी येथे राधाकृष्ण मंदिर सभागृह यांची भूमिपूजने तसेच साले गाव अंतर्गत रस्ता तयार करणे (3 लाख), सुरव/तळे येथे साकव बांधणे (14 लाख), खरवली नदीवर संरक्षण भिंत बांधणे (7.5 लाख) या कामाचे उद्घाटने आ. भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडली. तसेच यावेळी ग्रा.पं. खरवली सरपंच संतोष खडतर, उपसरपंच निशा आडीत, सदस्य सुजित सकपाळ, योगेश शिर्के, कल्पेश मोरे, चंद्रा जगताप, शुभम जंगम, प्रदीत आडीत, सतिष ढेपे यांचा सत्कार आ. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानेदव पोवार, माणगाव, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, शिसवेना तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, उपजिल्हा संघटिका शर्मिला सुर्वे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक ॲड. सुशील दसवते, शहरप्रमुख सुनील पवार, शहर सचिव विरेश येरुणकर, उपतालुका प्रमुख प्रशांत अधिकारी, गणपत महाडिक, महेंद्र जंगम, संतोष सकपाळ, स्वप्निल दसवते, विलास मोरे, विनोद सुतार, संजय जाधव, प्रसाद अंबूर्ले, समीर लहाने, राजाराम खडतर, समीर आडीत, दिपक तांबट, सुजित खडतर, सुनील खडतर आदी शिसवेना, शेकाप पदाधिकारी, खरवली विभाग ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी आ. गोगवले पुढे म्हणाले की, या सरकारमार्फत विविध योजना गतिमान पद्धतीने राबविण्यात येत आहेत. हा विभाग माझ्या मतदारसंघात येत नसला तरी या विभागात विकासकामांची कमी पडू देणार नाही. सर्व विकासकामे करण्यात येतील. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय कोणी घेऊ नये, असा टोला यावेळी आ. गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगावला.

आ. भरत गोगावले यांच्या माध्यमातून खरवली विभागामध्ये 2.50 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. आम्ही मजूर केलेल्या विकासकामाची उद्घाटने दुसऱ्या पक्षाने केली. आ. भरत गोगावले हे कधीच विकासकामांची कमी पडू देणार नाहीत. युतीमध्ये आहोत म्हणून नाहीतर विरोधकांना त्यांची जागा दाखवली असती.

ॲड. महेंद्र मानकर,
तालुका प्रमुख, शिवसेना

खा. सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नेहमीच दुसऱ्या पक्षांनी मंजूर केलेल्या विकासकामांची भूमीपूजने, उद्घाटने करण्यात पुढे असतात. ही परिस्थिती कायम असते. आम्ही, शेतकरी कामगार पक्षांनी त्यांच्यासोबत असताना याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. लवकरच शिवसेनेलादेखील याचा अनुभव येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्यानी मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने करून जनतेची दिशाभूल करतो.

रमेश मोरे,
शेकाप तालुका चिटणीस तथा सभापती कृउबा
Exit mobile version