। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वेला विलीन करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, कोकण रेल्वे हा झोन स्वतंत्र असला पाहिजे, असे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी सांगितले आहे.
कोकण रेल्वे संदर्भात प्रकल्पग्रस्त, बेरोजगार व प्रवाशांच्या काही समस्या यासाठी अजुनही आम्हाला ओरड व आंदोलने करावी लागत आहेत. कारण कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते परप्रांतीय आहेत. त्यांना कोकणातील रेल्वे समस्यांविषयी माहिती नसते. कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वेला विलीन केल्यानंतर जे निकष सेंट्रल रेल्वे कर्मचार्यांना लागू आहेत तेच कोकण रेल्वे कर्मचार्यांना लागू होतील याचा आम्हाला आनंद आहे. परंतु, भरती प्रक्रिया, गाड्यांना मिळणारे थांबे व कोकणातील प्रवाशांच्या सुविधा तसेच कर्मचार्यांच्या बदल्या यासाठी कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वेला विलीन झाल्यावर स्वतंत्र झोन हे कोकण रेल्वेचे असले पाहिजे व त्यांचे मुख्य कार्यालय जे बेलापूर येथे आहे ते तिथेच असले पाहिजे. तेथुनच कोकण रेल्वेची प्रक्रिया व सुत्रे चालली पाहिजेत, असे मुकादम यांनी सांगितले.