स्थानिकांच्या रक्षणासाठी तीव्र लढा देऊ

हुतामाकी कंपनी प्रशासनाला आ. थोरवेंचा इशारा

| वावोशी । वार्ताहर ।

हुतामाकी कंपनी प्रशासनाने शिरवली गावासह वावोशी, गोरठण बुद्रुक, आदी स्थानिक गावातील कामगारांना एकाकी कामावरून काढून टाकत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले व कंपनीच्या गेटवर ठिय्या टाकून आंदोलन केले. सदर घटनेची दखल आ. महेंद्र थोरवे यांनी तात्काळ स्थानिक कामगार कपात थांबवावी. एकही स्थानिक कामगारांना नोकरीवरून तडकाफडकी कमी करू नये. अन्यथा स्थानिकांच्या रक्षणासाठी तीव्र लढा देऊ असा इशारा आमदारांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.

ज्या स्थानिक कामगारांना कमी केले आहे त्यांना पुन्हा रुजू करून घ्या. हुकुमशाही पद्धतीने व्यवस्थापन कामगारांशी ज्या पद्धतीने वागत आहे ते खपवून घेतले जाणार येत्या सोमवार पर्यंत स्थानिक कामगारांच्या हिताचा निर्णय घ्या. आमचा कंपनीशी कोणताच वाद नाही आमचं कंपनीला कायमच सहकार्य राहिले आहे, मात्र जर येथील कामगारांवर अन्याय होत असेल तर आम्ही सर्वपक्षीय राजकारणी एकत्र येऊन स्थानिकांच्या रक्षणासाठी तीव्र लढा देऊ, असा इशारा आमदारांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत विजय पाटील, सभापती एच आर पाटील, सरपंच शैलेश मोरे, माजी सरपंच राजू शहासने, संदेश पाटील, महेश पाटील, नंदू शहासने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतू सोमवारी हुतामाकी कंपनी प्रशासन येथील स्थानिक कामगारांविषयी कोणती भूमिका घेणार याकडे मात्र स्थानिक कामगार व ग्रामस्थ यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version