अलिबागचा आम्ही यूपी, बिहार होऊ देणार नाही

महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावरुन चित्रलेखा पाटील आक्रमक
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यात मांडवा पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीला 25 लोक मारहाण करतात तेव्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा कुठे होती? असा प्रश्‍न विचारत शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पोलिस प्रशासनावर सडकून टिका केली आहे. त्या शेकाप आयोजित खानाव येथे बुधवारी (दि.13) रास्ता रोको आंदोलनामध्ये बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या आता सर्व दुर्गांना जाग होण्याची वेळ आली आहे. आपल्याला वेगळ्या पद्धतीने न्याय मिळवायला लागेल. लाल बावटा आणि त्याच्या बरोबर असलेले सगळे युवक आणि वडिलधार्‍यांच्या आशिर्वादाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायच काम शेकाप करेल. अलिबागचा आम्ही यूपी, बिहार होऊ देणार नाही. महिलांची सुरक्षा हे पोलिस प्रशासनाच काम आहे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version