। अलिबाग | विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ वामन तथा कबन नाईक लिखित कृतज्ञ मी, कृतार्थ मी या आत्मचरित्राचे आणि स्व. प्रभाकर पाटील यांच्या सान्निध्यातील आठवणींना उजाळा देणारे ङ्गमाझ्या आठवणीतील भाऊफ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 3.30 वाजता पीएनपी नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आ. भरत गोगावले, माजी आ. पंडित पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, रघुजीराजे आंग्रे उपस्थित राहणार आहेत.
पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष ल.नि. नातू, कृषीभूषण जयंतराव चौधरी, पालघर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विशेष शासकीय अभियोक्ता अॅड. प्रदीप घरत, मावळते नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, समाजसेवक गजेंद्रदळी, रायगड भूषण रमेश नाईक आदींची विशेष उपस्थिती असणार आहे. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन तुषार नाईक, अश्लेषा नाईक, मृणाल नाईक, ईशा नाईक यांनी केले आहे.