| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूला पदक जिंकण्यात अपयश आले. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो गटात ती चौथ्या स्थानावर राहिली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या कार्यक्रमानंतर एक व्हिडिओ जारी केला. ज्यात मीराबाई म्हणाली की, मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केला, पण पदक निसटले. पुढच्या वेळी मी आणखी मेहनत करेन.
टोकियोच्या रौप्यपदक विजेत्या मीराबाईने दक्षिण पॅरिस एरिना येथे एकूण 190 किलो वजन उचलले आणि चौथे स्थान पटकावले. चीनच्या हु जिहुईने 206 किलो वजन उचलून ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. रोमानियाच्या मिहाएला व्हॅलेंटिनाने (205 किलो) रौप्य आणि थायलंडच्या खांबाओ सुलोचनाने 200 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले.
मीराबाई चानूने एकूण 199 किलो (88 किलो स्नॅच + 111 किलो क्लीन अँड जर्क) सह चौथे स्थान पटकावले. मीराबाई चानूने स्नॅच फेरीत पहिल्याच प्रयत्नात 85 किलो वजन उचलून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. मात्र, दुसर्या प्रयत्नात तिला 88 किलो वजन उचलता आले नाही, मात्र तिसर्या प्रयत्नात तिने हे वजन यशस्वीपणे उचलले. मीराबाईला क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नात 111 किलो वजन उचलण्यात अपयश आले. त्यानंतर दुसर्या प्रयत्नात यश संपादन केले. मीराबाईने शेवटच्या प्रयत्नात वजन वाढवले, पण अपयश आले.