। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील श्री.संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी व वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ खांब यांच्या वतीने दि.7 रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिंडीचे रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सुतारवाडी येथील गीताबाग नर्सरी येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
स्वा. सु. गुरूवर्य अलिबागकर बाबा, धोंडू महाराज कोलाटकर व गोपाळ महाराज वाजे यांचे कृपात्राखाली दिंडीचे अध्यक्ष कृष्णा महाराज जाधव व मारूती महाराज कोलाटकर तसेच कृष्णा महाराज थिटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यातनामदेव महाराज यादव, ज्ञानेश्वर लोखंडे, मोरेश्वर मरवडे, कृष्णाराम धनवी, अजय पार्ठे, गणेश जाधव, किशोर लोखंडे,शांताराम महाडिक, नारायण लोखंडे, आदी प्रमुख सांप्रदायिक मंडळींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.