| नेरळ | प्रतिनिधी |
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भीम आर्मीचे संस्थापक ॲड. चंद्रशेखर आझाद यांनी नेरळ गावात भेट दिली. चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या धावत्या भेटीमध्ये हुतात्मे, क्रांतिकारक यांना अभिवादन केले तसेच आझाद विश्व स्तंभाचे अनावरण केले.
तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या चंद्रशेखर आझाद यांना पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती. आझाद यांनी माथेरान नाक्यावरील हुतात्मा स्मारक येथे जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. तेथून बाईक रॅली सह नेरळ गावात आल्यावर हुतात्मा हिराजी पाटील चौकात हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलक यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुमित साबळे, आजाद समाज पार्टीचे रायगड प्रभारी सिद्धार्थ सदावर्ते, संजय सदावर्ते, ॲड. सम्यक सदावर्ते, मिलिंद किर्ते, स्वप्निल सदावर्ते, जाकिर खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रशेखर आझादांचे नेरळमध्ये स्वागत
