। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील जसखार गावचे राजेश पाटील यांनी आषाढी एकादशीनिमित्त मोरा कोळीवाडा ग्रामस्थांच्यावतीने पालखी काढण्यात आली होती. मोरा येथुन निघालेल्या दिंडी व पालखीचे पी.जे. पाटील यांच्या घराजवळ माऊलीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. पुढे पिरवाडी येथील समुद्रकिनारी पालखीची सांगता समारोप करण्यात आला. यावेळी पी.जे.पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील व कांचन राजेश पाटील यांनी सर्व वारकरी मंडळींचे स्वागत केले. या कामी कैलास म्हात्रे, भावना म्हात्रे, चार्वी पाटील व कार्यक्रमाचे आयोजक समर्थ पाटील, मनिषा निवेडकर, दत्तात्रेय घरत, काशीनाथ ठाकुर, गयाबाई वर्तक व रवी चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.