पोलीस निरीक्षक काळसेकर यांचे स्वागत

। शिहू । वार्ताहर ।

नागोठणे पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्य्क पोलीस निरीक्षक काळसेकर यांचे स्वागत नागोठणे महिला दक्षता समितीकडून स्वागत करण्यात आले.

यावेळी सुजाता जवके, कल्पना टक्के, दर्शना जवके, शबाना मुल्ला, निलोफर पानसरे, अपर्णा सुटे, डॉ. कांचन शेळके, मंजुळा म्हात्रे, संगीता पोलसानी, नंदा गायकवाड उपस्थित होत्या.

नागोठणे पोलीस ठाण्यात काळसेकर हे सहाय्य्क पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले असून या पूर्वी ते खोपोली येथे पोलीस अधिकारी होते. नागोठणे परिसरातील शाळेतील मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न, सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार या संदर्भात सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या गुन्हाना आळा घालण्यासाठी महिला दक्षता समितीने लक्ष घालावे व ज्या ठिकाणी गरज पडेल तिथे पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थित दक्षता समितीच्या महिलांना केले.

Exit mobile version