कोलाड-आंबेवाडी नाक्यावर शरद पवारांचे स्वागत

| कोलाड | वार्ताहर |

रायगड लोकसभा मतदार संघात निवडणुक प्रचाराला जोरदार रंग चढला असून दस्तुरखुद्द इंडीया आघाडीचे नेते शरदचंद्र पवार यांनी सुनील तटकरे यांच्या होम ग्राऊंडवर गीतेंच्या विजयासाठी कोलाड आंबेवाडी येथे श्री आंबरसावत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला. रायगड लोकसभा निवडणुकीतून तटकरेना पराभूत करण्यासाठी तर अनंत गीते यांना लोकसभेत भरघोस मतांनी विजय होण्यासाठी आंबेवाडी येथील ग्राम दैवताला साकडे घातले. तसेच भ्रष्ट कारभारी नेत्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे गितेना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात उतरले. तर तटकरेंच्या पराभवासाठी पवारांची तोफ रायगडात विषेतः त्यांच्या बालेकिल्ल्यात रोहा तालुक्यातील मौजे कोलाड आंबेवाडी नाक्यावर धडकत आघाडीचे उमेदवार गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ इंडीया आघाडीच्या वतीने मोठया जल्लोषात करण्यात आला.

यावेळी शेकाप नेते आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, विष्णू पाटील, सुरेश खैरे, समीर शेडगे, दीपक तेंडुलकर, शंकरराव म्हसकर, राजेश सानप, गणेश शिंदे, चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत,शिवराम महाबले, मारूती खांडेकर सर,मनोहर महाबले, विठ्ठलराव मोरे,राजेश काफरे, आदित्य कोंडळकर, अनिश शिंदे, बबलूशेठ सय्यद, शांताराम महाडिक, गणेश मढवी, सुनील महाडीक, मारूती बुवा लोखंडे, विष्णु लोखंडे, समिर महाबले, कुलदीप सुतार, बिन्धास्त धनावडे, अरविंद भिलारे, संकेत सोस्टे, बिलाल मोरबी, एलियाज डबीर, जुल्फिका डबीर, मझर सिद्दीक,अमीर तेलंगे, नितीन वारांगे, निलेश वारंगे, सौ. चेतना लोखंडे, संज्योत पडवळ, कस्तुरी सुतार, ऐश्‍वर्या शिंदे, आदी मान्यवर तसेच इंडीया आघाडीचे रोहा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आदी घटक पक्षांचे कार्यकर्ते, तसेच रोहा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, आदी घटक पक्षातील तथा इंडीया आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version