रायगड किल्ल्यावरून पहाटे 2 वाहत प्रस्थान
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड खारआंबोळी येथील शिवप्रेमी मित्र मंडळाचे 200 युवक शिवजयंतीनिमित्त सलग सात वर्ष शिवरायांच्या रायगड किल्ल्यावर जाऊन शिवरायांचा आशीर्वाद घेऊन प्रतिमेसमोर ज्योत प्रज्ज्वलित करून मुरुडकडे निघाले पहाटे 2 वाजता निघले. मुरुड शहरात 11 वाजता पोचले शिवज्योतीचे मुरुडकरांनी उत्सहात स्वागत केले. येणार्या शिवप्रेमींना पाणी सरबत देऊन पुन्हा चालण्यासाठी सज्ज करत होते. प्रत्यक 3 किमी नंतर ज्योत घेणार बदलत असल्याने प्रवास सुखाचे पण खडतर झाला. परंतु शिवरायांवरचे प्रेम असल्याने गंगेला 7 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. 200 युवकाच्या 10 महिला असल्याने या मंडळाचे कौतुक होत आहे. मंडळाचे चिंतामणी बेडेकर, गणेश गोसावी, संकेत म्हात्रे, अक्षय बेडेकर, दीपेश पेरवे, मंगेश खंडागळे आदी शिवप्रेमींच्या सहभाग होता.
खारआंबोली हे गाव शौर्य खेळात कायम पुढे असते .तेथील युवावर्ग भजन कीर्तन आणि वारकरी संप्रदायातील असून खरे शिवप्रेमी आहेत. शिवज्योत मुरुड शहरात आल्यावर बाजारात भव्य स्वागत करण्यात आले. नंतर पालिकेत शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून गावात जुनी पेठ, अलंकापुरी येथील शिवप्रतिमेला नमन करून ज्योत मूळगावी म्हणजे खारआंबोली येथे नेण्यात आली.