वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव

अश्‍वीनच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजची नांगी; यशस्वीचे पदापर्णातच दमदार शतक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावत 429 धावा केल्या. भारताला 271 धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसर्‍या डावात 130 धावांत गारद झाला.

रविचंद्रन अश्‍विनने अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा संघ 130 धावांत गुंडाळला. पहिल्या डावात पाच बळी घेतल्यानंतर अश्‍विनने दुसर्‍या डावात तब्बल सात गडी बाद केले. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 5 गड्यांच्या मोबदल्यात 429 धावा केल्या. टीम इंडियाला 271 धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसर्‍या डावात 130 धावांत गारद झाला.

रोहित, यशस्वीचे शतक
यशस्वी जैस्वाल, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी भारतासाठी शानदार खेळी खेळली. यशस्वीने 171 धावा केल्या. ही त्याची पदार्पणाची कसोटी होती. त्याचवेळी कर्णधार रोहितने 104 धावांची खेळी केली. विराट कोहली शतकही करू शकला नाही आणि 76 धावा करून बाद झाला.

फिरकीची जादू
फिरकीची जादू दाखवत अश्‍विनला विंडीज संघाचा दुसरा डाव गुंडाळण्यास जास्त वेळ लागला नाही. 58 धावसंख्येपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला होता. यानंतर संपूर्ण संघ 130 धावांवर बाद झाला. अश्‍विनने कारकीर्दीत 34 व्यांदा एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला, आणि दोन्ही डावात मिळून 8व्यांदा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या सामन्यात 171 धावांच्या खेळीसाठी यशस्वीला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे.

Exit mobile version