| पनवेल | प्रतिनिधी |
भोपाळ येथे झालेल्या 12 वी वेस्ट झोन शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उरणमधील अवनी कोळी हिने ज्युनिअर व युथ ट्रॅप रायफलमध्ये दुहेरी रौप्यपदक जिंकत चमक दाखवली. तसेच, वरा देवळेकर व कार्तिकी देवळेकर या बहिणींनी डबल ट्रॅप शॉटगनमध्ये रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. गोव्यात झालेल्या वेस्ट झोन रायफल-अँड-पिस्टल स्पर्धेत नंदकुमार माने, कुणाल पाटील आणि किशन खारके यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.सर्व विजेते सिद्धांत रायफल अँड पिस्टल शूटिंग क्लबचे सदस्य असून, आता ते दिल्ली येथे महाराष्ट्र रायफल संघटनेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या उज्ज्वल यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, प्रशिक्षक किशन खारके आणि संपूर्ण प्रशिक्षक टीमकडून सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







