भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं चाललंय तरी काय

महिला अत्याचारप्रकरणी आणखी एक जिल्हाध्यक्ष अडकला
। सोलापूर । प्रतिनिधी ।

अलिकडेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी अविवाहित महिलेच्या इच्छेविरुध्द शारीरीक अत्याचार करून तिची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. एका पाठोपाठ एक जिल्हाध्यक्ष महिला अत्याचार प्रकरणात अडकत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींवर नामुष्की ओढावली आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी या प्रकरणाबाबत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यामुळे ते उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याने न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत अटक करू नये, असे पोलिसांना आदेश दिले आहेत.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने श्रीकांत देशमुखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. श्रीकांत देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी (दि.24) सुनावणी पार पडली. त्यावेळी ते न्यायालयात उपस्थित नव्हते. परंतु, त्यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे 26 ऑगस्टपर्यंत त्यांना अटकेपासून अभय मिळाले आहे.

Exit mobile version