तांत्रिक बिघाडांमुळे सोशल मीडिया बंद

इंस्टाग्राम, फेसबुक शांत

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगाच्या अनेक भागांमध्ये तांत्रिक बिघाडांमुळे बंद पडले आहे. सोमवारी रात्री ८.३० नंतर अनेकांना ह्या अडचणी जाणवल्या. फेसबुकचे भारतात 410 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत आणि त्याचे व्हॉट्सअॅप मेसेंजर 530 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांसह देशातील सर्वात मोठं मार्केट आहे. “क्षमस्व, काहीतरी चूक झाली. आम्ही त्यावर काम करत आहोत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर ते दुरुस्त करू,” फेसबुक वेबसाइटवरील संदेशात म्हटले आहे.

Exit mobile version