। मुंबई । वृत्तसंस्था ।
इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन झाले आहे. गेल्या काही तासांपासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन असल्याचा मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात आहे. व्हॉट्सअपवर येणाऱ्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर, दुसरीकेड ट्विटरवर व्हॉट्सअप डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉट्सअपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. सुरुवातीला इंटरनेटची समस्या असू शकते असे अनेकांना वाटत होते. मात्र, इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्सअपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. काही वेळेत ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला. ऐन दिवाळी सणात व्हॉटअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आहे.
व्हॉट्सअपची मालकी असणाऱ्या मेटा कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही तसेच व्हॉट्सअपची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काम केले जात असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही तासांपासून जगभरात व्हॉट्सअप बंद; लाखो युजर्सना फटका
