| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या सोयीसाठी दोन व्हिलचेअर भेट देण्यात आल्या आहेत. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमामुळे रुग्णांना रुग्णालयात ये-जा करताना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी मुरुड वैद्यकीय अधीक्षक डॉ. महालिंग क्षीरसागर, डॉ. युक्ता गुरव, पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर, उपाध्यक्ष दिव्या सतविडकर, सचिव दिव्येश बोरडे, खजिनदार दिपक जोशी, शकील शाबान, इम्तियाज शाबान, खालीद काजी, खुबी बघेल, प्रविणा मुकादम, नामदेव शाहिरे, हर्षदा म्हात्रे, श्रध्दा अडकाई आदिंसह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अरविंद गायकर यांनी सांगितले की, आमचे मंडळ अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहे. गरजू नागरिकांना मदत करण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रातही मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज दोन व्हिलचेअर रुग्णांसाठी भेट देत आहोत. रुग्णांच्या सेवेसाठी जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. भविष्यातही ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक ती मदत करण्यासाठी मंडळ सदैव पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले.
ग्रामीण रुग्णालयाला व्हिलचेअर भेट
