वेळ आली की मी बोलणार -सोनू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
 आयकर विभागाने त्यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्याने आपल्या शैलीमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटसह, त्याने ‘हार्ट’ चे इमोजी देखील शेअर केले आहेत आणि इंग्रजीमध्ये लिहिले आहे, आपल्याला नेहमी आपल्या भूमिकेवर उभे राहण्याची गरज नाही, वेळ याबद्दल सांगेन,असे सुचक वक्तव्यही त्याने केले आहे. तो पुढे म्हणतो की, ‘मी माझ्या संपूर्ण क्षमतेने आणि मनापासून देशातील लोकांची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या फाउंडेशनचा प्रत्येक रुपया कुणाचा अमूल्य जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचण्याची वाट पाहत आहे. आयकर विभागाने सोनू सूदच्या   घरी आणि कार्यालयात पोहोचली होती. आयटी विभाग सोनूच्या 6 विविध ठिकाणी धाडी टाकून 20 कोटी करचुकवेगिरीचा आरोप केला आहे.   आम आदमी पार्टी (आप) आणि शिवसेनेने आयकर विभागाच्या या कारवाईवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सोनू सूदने कोरोना साथीच्या काळात सामान्य लोकांना मदत करून खूप प्रशंसा मिळवली होती.

Exit mobile version