| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड एसटी आगार जिल्ह्यात क्रमांक 1चे आगार आहे. मात्र, सध्या या आगाराची अवस्था अंत्यंत बिकट झाली आहे. या आगारातील अनेक वर्षांपासुन रखडलेल्या रस्त्यातुन प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुरूड आगार खड्डेमुक्त कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांसह प्रवासी वर्ग आगार प्रशासनाला विचारत आहे.
मुरूड हे जागतिक किर्तीचे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी देश विदेशातुन पर्यटकांची रेलचेल असते. परंतु, गेले काही वर्ष येथील एसटी आगारात काहीच सुधारणा होताना दिसत नाहीत. मुरुड आगारातील रस्त्याच्या कॉक्रिटीकरणासाठी चार वर्षांपुर्वी निधी मंजूर करण्यात आला होता. तरीदेखील हा रस्ता अपुर्णावस्थेत आहे. परिणामी पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी भरते. त्याचबरोबर खड्ड्यांचा आकारही वाढ चालला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना स्थानिकांसह प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा अपुर्ण रस्ता पुर्ण कधी होणार, असा संतप्त प्रश्न एसटी प्रशासनाला विचारला जात आहे. रस्ता पुर्ण करणे शक्य नसेल तर रस्त्यावरील खड्डा तात्पुरता खड्डी टाकुन बुजवावा, अशी मागणी प्रवासी करित आहेत.
मुरुड एसटी डेपो खड्डे मुक्त कधी होणार?
