विधानसभानिहाय टक्केवारीत घट; बारणेंना फटका
| पनवेल | प्रतिनिधी |
खासदार श्रीरंग बारणे यांच्या पारड्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भरभरून मते टाकणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रात यंदा मतांचा टक्का घासरला आहे. तर मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या पार्थ पवार यांच्या पारड्यात जास्तीत जास्त मतांचे दान टाकणाऱ्या कर्जत आणि उरण मतदार संघात इतर मतदार संघापेक्षा जास्त प्रमाणात मतदान झाल्याने विधानसभा निहाय टक्केवारीमुळे उमेदवारांची धडधड वाढणार आहे.
2019 साली पार पडलेल्या निवडणुकीत मावळ लोकसभा निवडणुकीत 59 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा या अकड्यात घट झाली असून केवळ 52 टक्केच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या आकडेवारीत झालेल्या घटाचा परिणाम उमेदवारांच्या मटताधिक्यावर पडणार असल्याने कमी झालेली मतांची आकडेवारी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
2019 साली बारणे यांना मताधिक्य देणाऱ्या विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या टक्केवारीत यंदा कमालीची घट झल्याचे पाहायला मिळत आहे. 2019 सालच्या लोकसभेला चिंचवड विधानसभा मतदार संघात 56.91 टक्के मतदान झाले होते. बारणे यांना सर्वाधिक 96 हजार मतांची आघाडी देणाऱ्या या मतदार संघातील मतदानात यंदा घट झाली असून, 49.43 टक्के मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बाजवला आहे. तर बारणे यांना दुसऱ्या क्रमांकांची 54 हजाराची आघाडी देणाऱ्या पनवेल मतदार संघात देखील मतांच्या टक्केवारीत घट होऊन 53.33 वरून ही आकडेवारी 49.21 टक्क्यावर आली आहे. त्याचप्रमाणे बारणे यांना मताधिक्य देणाऱ्या विधानसभा मतदार संघात 2019 साली अनुक्रमे 62.60 टक्के मतदान झालेल्या मावळ लोकसभा मतदार संघात यंदा मतदानाच्या टक्केवारीत कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदा या मतदार संघात केवळ 53.02 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, पिंपरी विधानसभा मतदार संघात मागील वेळी 54.66 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असताना यंदा हा आकडा 48.25 टाक्यावर आला आहे.
शेकापची भूमिका महत्वाची महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने यंदाची निवडणूक महत्वाची केली होती. शेकाप तसेच कॉग्रेस पक्षाकडून विशेषता उरण विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी करता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याने येथील दोन्ही पक्षाची भूमिका महाविकास आघाडीसाठी सोयीची ठरण्याची शक्यता आहे.
पनवेल मताधिक्य घटण्याची शक्यता मतदार संघात बारणे यांच्यावर असलेली नाराजी वाघेरेच्या पथ्याशी पडण्याची शक्यता असून, पनवेल विधानसभा मतदार संघात कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे बारणे यांच्या मताधिक्यात कमालीची घट होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.