मुंबईची धुरा कोणाकडे?

रोहित की हार्दिक

| मुंबई | प्रतिनिधी |

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सने आपला माजी खेळाडू हार्दिक पंड्याचा संघात परत समावेश केला आहे. तो गेली दोन वर्षे गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. हार्दिकडे रोहित शर्माचा उत्तराधिकारी पाहिले जात असून, मुंबईचा तो भावी कर्णधार असेल. मात्र, सध्या प्रश्न असा आहे की आयपीएल 2024 मध्ये मुंबईचा कर्णधार कोण असेल? मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल चषक जिंकले आहेत.

हार्दिक पंड्याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधूनच केली होती. 2020 मध्ये त्याने गुजरात टायटन्स या नवीन संघात सामील होण्यासाठी ही फ्रेंचायझी सोडली. जेव्हा या फ्रँचायझीने हार्दिकला कर्णधार बनवले, तेव्हा हार्दिकनेही या फ्रँचायझीला निराश केले नाही आणि पहिल्याच सत्रात त्यांना चॅम्पियन बनवले. गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी हार्दिकच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना खेळला, मात्र यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हार्दिकचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने एमआयमध्ये उपकर्णधार होण्यासाठी हार्दिकने गुजरातचे कर्णधारपद का सोडले, असा प्रश्न सध्या क्रिकेटवर्तुळात विचारला जात आहेत.

Exit mobile version