| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ महिला प्रीमियर लीगसाठी जोरदार तयारी करीत असून, यासाठी फ्रेंचायझी आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलावही होणार आहे. या लिलावात खेळाडू विकत घेतले जाणार आहेत. ही लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी बीसीसीआयने मलिका अडवाणीची नियुक्ती केली आहे. या लिलावात कोणत्या महिला खेळाडू किती बोली लागतेय याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
महिला प्रीमियर लीगचा पहिला मोसम यंदा खेळवला जाणार आहे. पहिल्या पर्वाचा लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे. या लिलावासाठी एकूण 409 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 246 भारतीय आणि 163 विदेशी खेळाडू असतील. लिलावात फक्त 90 खेळाडू विकत घेतले जातील. ही स्पर्धा मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.