| बिहार | वृत्तसंस्था |
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा 11नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर आज (दि.14) मतमोजणी पार पडत आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून बिहारमध्ये पुन्हा एनडीए सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत हाती आलेला कौल हा महायुतीच्या बाजून दिसत आहे. एनडीएला किती जागा मिळणार? तसेच महाआघाडीला किती जागा मिळणार? जन सुराज्य पक्षाला किती जागा मिळणार? बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
NDA ची विजयाच्या दिशेने वाटचाल, भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष
भाजप - 88
जेडीयू - 81
आरजेडी - 28
काँग्रेस - 7
अन्य - 39
