big boss 3! या विकेंडला कोण जाणार बाहेर?

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस (big boss marathi 3) मध्ये रंगत वाढू लागली आहे. दिग्गज कलाकार घराबाहेर पडत आहेत. अविष्कार दारव्हेकर गेल्यानंतर झालेल्या नॉमिनेशनच्या कार्यात विशाल निकम (Vishal Nikam), सोनाली पाटील (Sonali Patil), जय दुधाने (Jay Dudhane), मिनल शहा (Minal Shah), तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना घरातील सदस्यांनी नॉमिनेट केले आहे. गेल्या काही आठवड्यातील प्रेक्षकांचा कल पाहता सोनाली पाटील ही स्पर्धक बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त असल्याचे दिसून येत आहे. कारण यावेळी तिच्यासोबत असणार्‍या स्पर्धकांना प्रेक्षकांनी त्या तुलनेत जास्त पसंती दर्शविली आहे. सोनाली पाटील ही उत्तम स्पर्धक असली तरी प्रेक्षक कोणाला तारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात कालपासून कॅप्टन्सी कार्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये झालेल्या भांडणामुळे येत्या काळात घरातील राजकारण बघायला मिळणार आहे. यापूर्वी अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, आदिश वैद्य, अविष्कार देसाई या तिघांना आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. तर कीर्तनकार शिवलीला पाटीलने तब्येतीच्या कारणामुळे घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवलीला, अक्षय, सुरेखा, आदिश, अविष्कारनंतर कोण घराबाहेर जाणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील सदस्यांना घरात राहून आता सहा आठवडे झाले आहेत. त्यामुळे सातव्या आठवड्यात कोण टिकणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गेल्या आठवड्याभरात बिग बॉस मराठीच्या घरात अनेक रंगतदार टास्क रंगले. पहिल्या दिवसापासून एकत्र असणारे आज वेगळा गेम खेळताना दिसत आहेत. तर रविवारी झालेल्या वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेली निता शेट्टी-साळवी ही नक्की कोणत्या ग्रुपला मदत करणार याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version