पाऊस पडल्यास ट्रॉफी कोणाची?

| चेन्नई | वृत्‍तसंस्था |

आयपीएल 2024 चा अंतिम सामना हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम चेन्नई येथे खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांमध्ये याबाबत क्रेझ तर आहेच, सोबतच पावसामुळे हा सामना रद्द झाला तर अंतिम ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार, अशी भीतीही चाहत्यांना सतावत आहे.

कोलकाताने क्वालिफायर एक मध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. गुणतालिकेतही कोलकाता अव्वल स्थानावर होता आणि अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. आता हैदराबादनेही अंतिम फेरी गाठली आहे. अशा स्थितीत केकेआरला पुन्हा एकदा हैदराबादचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे केकेआरचा हैदराबादविरुद्धचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. या हंगामात कोलकाताने हैदराबादविरुद्ध दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एक साखळी सामना होता, तर दुसरा सामना क्वालिफायर सामना होता. केकेआरने हे दोन्ही सामने जिंकले. आणि आयपीएल 2024 चा फायनल पावसामुळे रद्द झाला, तर केकेआर हा विजेता संघ मानला जाईल, कारण कोलकाता आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये सर्वात वर आहे.

आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात पाऊस पडला आणि सामना खेळता आला नाही तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. राखीव दिवशी पाऊस पडला तरी पंच कसा तरी सामना 5-5 षटकांचा करण्याचा प्रयत्न करतील. जर 5 षटकांचा सामनाही शक्य नसेल तर किमान सुपर ओव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु समजा दोन्ही दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर अशा परिस्थितीत कोलकाता जिंकेल. गुणतालिकेत वरच्या स्थानावर असण्याचा फायदा कोलकाताला मिळेल आणि तो ट्रॉफी जिंकेल. केकेआरची ही तिसरी ट्रॉफी असेल. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर 26 मे रोजी चेन्नईमध्ये ढगाळ वातावरण असेल. या काळात किमान तापमान 29 अंश, तर कमाल तापमान 37 अंशांवर राहणार आहे.

Exit mobile version