पीएसएमएस इंग्लिश मिडिअम स्कूलवर शिक्षणअधिकारी फिदा का?

| पेण | प्रतिनिधी |
पेण मधील नामांकीत संस्था असलेली पीएसएमएस इंग्लिश मिडीयम स्कूल (गुरूकुल) या संस्थेने आर.टी.ई. अंतर्गत येणार्‍या मुलांजवळून 2015 पासून 2021 पर्यंत फी घेतली असून शिक्षण अधिकार कायदा 2009 चे उल्लंघन केले आहे. याबाबत या संस्थेविरूध्द रितसर तक्रार केली असून, त्या संस्थेविरूध्द कोणतीची कारवाई शिक्षण अधिकार्‍यांकडून करण्यात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

10 ऑक्टोबरला शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांना भ्रमन्ती ध्वनी वरून संपर्क करून विचारणा केली असता, त्यांनी जे उत्तर दिले त्यावरून एक गोष्ट निश्‍चित आहे की, पीएसएमएस इंग्लिश मिडियम स्कूलवर शिक्षण अधिकार्‍यांची मेहरनजर आहे. शिक्षण अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले की, माध्यमिकांशी संबंधित आहे. महत्वाची बाब म्हणजे शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 हा पहिले ते आठवीच्या मुलांसाठी असतो. मात्र, शिक्षण अधिकारांच उत्तर हे फक्त बोलवण होती. त्यांना असे वाटंल की पत्रकारांना कोणत्याही कायदयाचे ज्ञान नाही. परंतु शिक्षण अधिकारी हे विसरले की इयत्ता पहिली ते आठवी हे प्राथमिक विभागामध्ये मोडते. त्यामुळे शिक्षण अधिकार्‍यांच आणि पी.एस.एम.एस स्कूल चे काही हितसंबंध तर नाहीत ना? असा प्रश्‍न पालक वर्गाकडून केला जात आहे.

तर या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी डॉ. किरण पाटील यांना दुरध्वनी वरून संपर्क केले असता व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू आहे मी नंतर फोन लावतो. परंतु डॉ. किरण पाटील यांचा फोन आमच्या प्रतिनिधीला नंतर आला नाही.

Exit mobile version