| गडब | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे वडखळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार संजय जांभळे व पंचायत समिती गणातील उमेदवार ललिता म्हात्रे यांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीत उमेदवार संजय जांभळे म्हणाले की, जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. वडखळ खारेपाट भागांमध्ये अनेक समस्या आहेत. सत्ताधिकाऱ्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन खोटी आश्वासनं दिली. मात्र, या भागाला पाणी काय मिळाले नाही. त्यामुळे जनता आता त्यांच्या आश्वासनांना भुलणार नाही. मी जनतेचा एक सेवेकरी म्हणून जिल्हा परिषद उमेदवारी लढवत आहे. जनता अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असते. त्या प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम आम्ही रस्त्यावर उतरून करत आहोत. तसेच, कधीही कुठल्याही वेळेला धावून जाण्याची तयारी असते. त्यामुळे वडखळ मधली जनता माझ्या पाठीशी आहे, असे संजय जांभळे यांनी सांगितले.






