आंबेनळी घाटाचे रूंदीकरण आवश्यक

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्‍वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा आंबेनळी घाटाची गेल्यावर्षी 2021च्या अतिवृष्टी व भुस्खलनामुळे या घाटाची वाताहत होऊन तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र, नजिकच्या काळात पोलादपूर वाई सुरूर या राज्यमार्गाचे रूंदीकरण होण्यासोबतच आंबेनळी घाटाचे े रूंदीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे.
22 जुलै 2021 रोजी रात्रभर अतिवृष्टी आणि भुस्खलनामुळे पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्दपासून वरील भागात म्हणजे ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाटाच्या सुरूवातीपासूनच दरडी कोसळून राज्यमार्ग दरीमध्ये वाहून गेला आणि ठिकठिकाणी वाहने घेऊन जाणे सुमारे महिनाभर तरी अशक्य झाले होते. मोटारसायकलस्वारांनी जीव मुठीत घेऊन पोलादपूरपर्यंत वाहने आणल्यानंतर थोडाफार शिल्लक असलेल्या घाटरस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली. ज्याठिकाणी सातारा जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शक्य नव्हते तिथे महाड विभाग आणि पोलादपूर उपविभागामार्फत घाटरस्ता दुरूस्त करण्यात आला. सद्यस्थितीत महाबळेश्‍वरपर्यतचा रस्ता काही ठिकाणी अरूंद तसेच काही प्रमाणात वाहतुकीस धोकादायक असूनही एस.टी.बसेस, जीप आणि अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र, पावसाळयामध्ये पुन्हा या घाटरस्त्याला धोका निर्माण होणार असल्याने या घाटरस्त्याचे रूंदीकरण करण्याची गरज आहे. केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी करंजाडी रेल्वे स्थानकापासून विन्हेरे काटेतळी पोलादपूरमार्गे महाबळेश्‍वरपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करून आंबेनळी घाटाचे म्हणजेच फिटझगेराल्डचे रूंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे या मार्गावरून पर्यटन विकास तसेच ऐतिहासिक दर्शन साध्य होणार आहे.

Exit mobile version