। सांगली । प्रतिनिधी ।
सांगलीत एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीनेच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात युवती जखमी झाली आहे.
सांगलीतील कॉलेज कॉर्नर भागात बुधवारी (दि.07) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते. अचानक त्यांच्यात काहीतरी वाद झाले. रागातच तरुणाने गाडीतून चाकू काढला आणि तिच्यावर वार करायला सुरुवात केली. वार करत असताना बचावासाठी तरुणीने हात आडवा केल्याने हातावर चाकूचा घाव बसला. त्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला उपचारासाठी तात्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे नाव प्रांजल काळे (19) असून दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.