। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सागवाडी,बेलोशी येथे पतीने पत्नीचा चाकूचे वार करुन खून करण्याची घटना मंगळवारी (दि.15) पहाटे घडली आहे. सागवाडी बेलोशी येथील परेश जानू शिद यांच्या घरातील हॉलमध्ये त्याची बहीण रेणुका रमाकांत मेंगाळ,वय 21,रा.भोमोली या ही झोपली होती.
मध्यरात्री 2 च्या सुमारास तिचा पती रमाकांत चाया मेंगाळ हा घराच्या मागील बाजूकडील उघड्या दरवाजातून हॉलमध्ये आला आणि त्याने झोपलेल्या रेणुकाच्या शरीरावर चाकूने वार करुन तिला ठार मारले.
याबाबतची फिर्याद परेश शिद याने रेवदंडा पोलिसात दिली आहे.हत्येचे नेमके कारण समजले नाही.पोलिसानी तातडीने आरोपीला अटक केली आहे.त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.घटनास्थळी रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक मुपडे यांनी भेट दिली.अधिक तपास सुरु आहे.