वावंजे परिसरात उडाली खळबळ
| पनवेल | वार्ताहर |
सख्ख्या भावासह पत्नी व दोन मुले बेपत्ता झाल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असली तरी या घटनेमुळे वावंजे परिसरात खळबळ उडाली आहे.
वावंजे येथील भारत कंपाऊंडजवळ राहणारे रंजित यादव यांचा लहान भाऊ रुपेश यादव (34) उंची 5 फुट 7 इंच रंग सावळा, केस काळे, नाक सरळ, बांधा मजबूत असून अंगात पांढर्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट तसेच सोबत मोबाईल फोन आहे. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी गीनादेवी यादव (30) उंची 5 फुट, केस काळे लांब, वर्ण गोरा, बांधा मध्यम, नाक सरळ, डाव्या बाजूला नथ असून अंगात लाल रंगाचा ब्लाऊज व निळ्या रंगाची साडी, सोबत मोबाईल फोन आहे. त्याचप्रमाणे त्यांचा 12 वर्षाचा रवि हा मुलगा उंची 3 फुट, बांधा सडपातळ, नाक छोटे, केस काळे असून, अंगात पांढर्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व करड्या रंगाची कार्गो पॅन्ट तसेच 11 वर्षीय राधिका ही मुलगी उंची 2 फुट 8 इंच, वर्ण गोरा, केस काळे लांब, नाक सरळ, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा झगा घातलेला आहे. हे चौघेही राहत्या घरातून कुठेतरी निघून गेल्याने ते हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन नं.022-27452444, मो.नं. 9594434999 किंवा सहा.पो.उप.मनोहर चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.