। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायतमधील खोकरी भागात राहणार्या आदिवासी कुटुंबातील उमेश रमेश वाघमारे (26) हा पत्नीची हत्या करुन फरार झाला होता. तेव्हापासून मुरुड पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, हा आरोपी राजपुरी डोंगरावरील जंगलात लपला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी एक विशेष टीम तयार आरोपीला पकडण्यात यश मिळविले आहे. हा आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.