। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
वेंगुर्ले येथील विशाल होडावडेकर यांनी जिल्हा परिषद न्हावेली शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थी व शिक्षकांना डिजिटल साहित्याचा अध्ययन, अध्यापनात प्रभावी वापर करता यावा, यासाठी वायफाय सुविधा आणि एक वर्षापर्यंत रिचार्ज करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रसाद शेगले यांच्या प्रयत्नातून हे साध्य झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ व शिक्षकवृंद उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन सदस्या श्वेता माळकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले. मुख्याध्यापिका नाईक यांनी प्रास्ताविक केले. सान्वी शेडगे यांनी आभार मानले.







