उरण तालुक्यात रानडुक्करांची शिकार

| उरण । वार्ताहर ।

वन विभागाच्या अधिकार्‍यांना दीपावली सणात जंगलातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रित करण्यास सध्या वेळ मिळत नाही. या गोष्टीचा फायदा उठवत शिकाऱ्यांनी जंगलातील रानडुक्करांची शिकार करण्यास सुरुवात केली आहे. शिकारी हे शिकार केलेले रानडुक्करांचे मांस विक्रीसाठी गावा गावात फिरताना दिसत आहेत.

डोंगर कपारीत वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील जंगल परिसरात तसेच खाडी किनार्‍यावरील खारफुटीच्या वनराईत सध्या रानडुक्कर, ससा, बेकर हे प्राणी आढळून येत आहेत. सदर वन्यप्राणी हे भात शेती परिसरात वावरत असल्याची ओरड शेतकरी व्यक्त करत आहेत. अशा वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी वन अधिकारी वर्गाला वेळ मिळत नाही. या गोष्टीचा फायदा हा शिकारी करणार्‍या नागरीकांनी उठविला आहे.

रानसई, चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेश्‍वी, चिर्ले, पुनाडे, वशेणी, आवरे, पिरकोण ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर परिसरात रानडुक्करांचा तसेच इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शिकाऱ्यांनी बेसावधपणे वावरत असलेल्या अशा वन्यप्राण्यांची शिकार करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version