। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात जंगलातील रानभाज्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. शहरात कारंजा येथे आणि आठवडे बाजारात आदिवासी रानभाजी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
माथेरानच्या डोंगरात अनेक आदिवासी वाड्या असून हे आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी माथेरानच्या डोंगर भागात फिरून जंगली रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. श्रावण महिन्यामध्ये माथेरानच्या गर्द झाडी झुडपातील माथेरानच्या रानातील कड्यालगत उगवणारी रान भाजी, म्हणजेच गवती चहा, केळी, भाजी, शिरोळे, भेंडी, गवारी, शेपू, चिचुर्डी, टाकळ्याची भाजी, माठाची भाजी, कुरडू भाजी अशा अनेक रानभाज्या उपलब्ध होत असतात. अतिशय चविष्ट आणि रोग प्रतिकारक औषधी पालेभाज्या माथेरानच्या बाजारपेठेत आदिवासी लोक घेऊन येत असतात. सकाळच्या वेळी कारंजा येथे या रानभाज्या येत असल्याने स्थानिक नागरिक रानभाज्या खरेदी साठी गर्दी करून असतात. तर, माथेरान शहरात रविवारी आठवडा बाजार असतो. तसेच, माथेरान येथे येणारे पर्यटकसुद्धा या भाज्या घेण्यासाठी गर्दी करीत असतात.
माथेरानच्या डोंगरातील रानभाज्या बाजारात
