वाघाटी जातीच्या रानमांजराला जीवदान

| उरण | प्रतिनिधी ।

जंगलतोड, वाढते शहरीकरण, आणि पशु- पक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण, बेकायदेशीरपणे केली जाणारी पशु-पक्ष्यांची शिकारीमुळे निसर्गातील अनेक पशुपक्ष्यांच्या व वन्यजीवांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. त्यातलीच एक घटना उरण तालुक्यातील धुतूम गावाच्या हद्दीत पाहायला मिळाली. धुतूम गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकूर हे सकाळी वॉकिंगसाठी जात असतानां त्यांना रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल होतांना दिसली. धुतूम हद्दीत अज्ञात व्यक्तीने लावलेल्या फासकित (फासात) वाघाटी जातीची रानमांजर अडकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. त्यांनी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर व प्रविण कडू यांना या गोष्टीची माहिती देऊन कळविण्यात आले. ही माहिती मिळताच केअर ऑफ नेचर संस्थेची टीम घटनास्थळी जावून जागेची पाहणी करून फासकीतील त्या वाघाटी जातीच्या रानमांजराची सुखरूपपणे सुटका करून तिला उरण वनपरिक्षेत्राचे वनपाल सुनिल महाडिक यांनी मौजे वेश्वी- उरण येथील जंगलात त्यांच्या अधिवासात मुक्त संचार कारणासाठी सुखरूपपणे सोजण्यात आली.

Exit mobile version