वनरक्षकांसाठी वन्यजीव बचावकार्य कार्यशाळा

। अलिबाग । वार्ताहर ।
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून अलिबाग वनविभागाच्या वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजीवांचे बचावकार्य कसे करावे, याबाबतची कार्यशाळा तीनवीरा येथील वनविभागाच्या केंद्रामध्ये डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्याद्वारे घेण्यात आली.

अलिबाग आणि भोवतालचा परिसर हा नैसर्गिक जैवविविधतेने नटलेला आहे, त्यामुळे साप आणि अन्य वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर इथे आढळून येतो. अशा वेळी मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष हा स्वाभाविक आहे, अशा प्रसंगी वनविभागाची भूमिका फार महत्वाची असते. म्हणूनच वनरक्षकांना बचावकार्याचे योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असते. जेणेकरुन वन्यजीवांचे संरक्षण होईल. तसेच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असे डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी अलिबाग वनविभाग, वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबागचे अदिती सगर, ओमकार कामतेकर, पारस घरत, सुजित लाड, रुपेश गुरव, समीर पालकर आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजच्या सभासदांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version