वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह

। माणगाव । वार्ताहर ।
पन्हळघर बुद्रुक येथील आदिवासी वाडी येथे शनिवारी (दि.1) वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वनदेवतेची पूजा करून स्थानिक आदिवासीवाडीतील महिलांचा सत्कार करून ओटी भरण्यात आली. हा कार्यक्रम वनरक्षक रूपाली पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित केला होता. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन वनरक्षक दीपक तेटगुरे यांनी केले. यावेळी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे, अस्मिता शर्मा, सुजित राजमाने, वनरक्षक सुनीता वडजे, अनिल मोरे, अक्षय मोरे व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version