। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सर्वोच्च न्यायालयाने नागरिकता अधिनियम कलम 6 ची वैधता कायम ठेवण्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी पक्षाची बाजू बळकट झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम 6 वैध ठरवलं आहे. 1985 च्या आसाम करारानुसार हे कलम आणण्यात आलं होतं. यानुसार 1971 पूर्वी भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने 4-1 अशा बहुमताने हे कलम कायम ठेवलं आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर पार पडली.
12 डिसेंबर 2023 या दिवशी 17 याचिकांची सुनावणी झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरचा निर्णय राखून ठेवला होता, जो गुरुवारी (दि.17) देण्यात आला आहे. या खंडीपीठामध्ये न्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश एमएम सुरेश, न्यायाधीश जे.बी. पारडीवाला, जस्टिस मनोज मिश्रा आणि सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश होता. न्यायाधीश जे.बी. पारडीवाला यांनी कलम 6 अवैध असल्याचं म्हटलं आहे. मात्र 4-1 या निर्णयानुसार 6 वैध ठरवण्याचा निर्णय देण्यात आला आहे.